Vithu Rukmai
मित्रांनो, काय असेल पंढरपूरचे वैशिष्ठ्य, जिथे लाखो लोक दर वर्षी पायी येतात, जी 'वारी' या नावाने प्रसिद्ध आहे?
पंढरपूर हे असे स्थान आहे, जिथे परमेश्वर स्वत: आपल्या पत्नीसमवेत सगुण रुपात आहेत!
इथे कळेल आपल्याला वारीचे कारण आणि वैशिष्ठ्य भूवैकुंठ पंढरपूरचे!
पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो, पत्नी व आई-वडिल सत्यवती आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले, तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहाबरोबर जात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं'चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.
त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला, पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिकाजवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या.
यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला. तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे.
एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना, त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले.
शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिराजवळ आले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले.
पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात!
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete